CHAKAN MIDC CRIME : टचइलॅस्टिक कंपनीच्या दोन कोटींच्या मशीन्स गायब; शेडमालक अरोपीच्या पिंज-यात
म्हाळुंगे । सह्याद्री लाइव्ह । चाकण औद्यागिक वसाहतीतील टचइलॅस्टिक कंपनीच्या २१ मशीन्स कंपनी शेडमधून गायब झाल्याचा प्रकार घडला आहे. या मशीन्सची किंमत जवळजवळ दोन कोटी रूपये इतकी असून यासंबंधी म्हाळुंगे पालिस ठाण्यात शेडमालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात कंपनीचे मालक फिर्यादी प्रसनजित शितलचंद्र दास (मनिषा गार्डन आण्णासाहेब मगर मैदानासमोर, पिंपरी) यांनी शेडमालक गणेश संभाजी माळी (वय ४८, रा. न्यु. वृंदावन कॉ. हौसिंग सोसायटी, शिवाजीनगर, पुणे.) यांच्या विरोधात म्हाळुंगे पालिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, चाकण एमआयडीसीतील गणेश माळी यांचे शेड प्रसनजित दास यांनी भाडेतत्वावर घेतले होते. गणेश माळी यांच्या शेडमध्ये प्रसनजित दास यांच्या टचइलॅस्टिक कंपनीच्या मशीन्स ३१/११/२०२२ ते १/२/२०२३ या कालावधीसाठी ठेवल्या होत्या. कंपनी काही कारणास्मव बंद असल्यामूळ प्रसनजित दास यांनी मशीन्स शेडमध्येच झाकून ठेवल्या होत्या. प्रसनजित दास मशीन्स पहायला गेले असता त्यांना काही मशीन्स शेडबाहेर ताडपत्रीने झाकलेल्या आढळून आल्या. त्यांच्या एकून मशीन्सपैकी २१ मशीन्स शेडमध्ये नव्हत्या. त्याबद्दल जाब विचारला असता शेडमालकाकडे याचे उत्तर नसल्यामूळे शेडमालकानेच या मशीन्स कोणालातरी विकल्याचा अरोप प्रसनजित दास यांनी केला आहे.
याप्रकरणी म्हाळुंगे पोलिस ठाण्याचे निरिक्षक पाटील तपास करत आहेत.