हुतात्मा राजगुरु वक्तृत्व स्पर्धेचा सांघिक विजेतेपदाचा चषक चाकण महा विद्यालयाकडे तर पराग बदिरके व पार्थ भागवते यांचा प्रथम क्रमांक
राजगुरूनगर | सह्याद्री लाइव्ह।येथील हुतात्मा राजगुरु महाविद्यालयात आयोजित हुतात्मा शिवराम हरी राजगुरु आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सांघिक विजेतेपदाचा चषक व ५ हजार रुपयांचे रोख रकमेचे पारितोषिक चाकण महाविद्यालयाच्या समृद्धी मुंगसे, धीरज दिघे यांनी पटकावले. तर वरिष्ठ व कनिष्ठ गटात अनुक्रमे पराग बदिरके व पार्थ भागवते यांनी प्रथम क्रमांक पटकावला. दोन्ही गटातील विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व अनुक्रमे हुतात्मा राजगुरु चषक, साहेबरावजी बुट्टेपाटील स्मुतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, संचालक बाळासाहेब सांडभोर, सुशील शिंगवी, हिरामण सातकर, मुरलीधर खांगटे, सतिश नाईकरे, ऍड. बाळासाहेब लिंभोरे, प्राचार्य डॉ. एस. एस.पिंगळे, डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. संजय शिंदे, प्रा. व्ही. बी. दौंडकर, प्रबंधक कैलास पाचारणे उपस्थित होते. स्पर्धेचे हे ३१ वे वर्ष होते. या स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कक्षेतील सुमारे ३९ स्पर्धक सहभागी झाले.
स्पर्धेचे उद्घाटन करताना संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील यांनी वक्तृत्व कला म्हणजे वाणी आणि शब्दाद्वारे श्रोत्यांशी साधलेला सुसंवाद असून त्यात विचारांची सुस्पष्टता व वेधक मांडणी गरजेची असल्याचे सांगितले. संस्थेचे परीक्षक डॉ. वर्षा तोडमल यांनी वक्तृत्व स्पर्धेकांकडे ज्ञानशक्ती, हेतूशक्ती व भाषाशक्ती आवश्यक असल्याचे म्हटले. परीक्षक डॉ. पुरुषोत्तम काळे यांनी स्पर्धेकांकडे अंत:करणातील विचारांचा निखळपणा आणि प्रभावी मांडणी असावी, असे सांगितले.
वरिष्ठ गट – प्रथम क्रमांक पराग बदिरके (यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय, पुणे ७५००/- व करंडक), द्वितीय क्रमांक समृद्धी मुंगसे (कला, वाणिज्य महाविद्यालय, चाकण ५०००/- व करंडक ) व तृतीय क्रमांक अक्षदा कोळेकर (राजगुरू महाविद्यालय ३०००/- व करंडक) यांनी पटकविला.
कनिष्ठ गट – प्रथम क्रमांक पार्थ भागवते (भारतीय जैन विद्यालय पिंपरी ५०००/- व करंडक), द्वितीय क्रमांक सई सांडभोर (हुतात्मा राजगुरू महाविद्यालय ३०००/- व करंडक ) व तृतीय क्रमांक आदिती जवरे (पी. के. कॉमर्स कॉलेज चाकण ३०००/- व करंडक ) यांनी पटकविला.
उत्तेजनार्थ बक्षिसे वरिष्ठ गटात रोहन कवडे, प्राजक्ता कवडे, भास्कर शिवले तर कनिष्ठ गटात साक्षी आहेर, सानिया शेख, समर्थ कदम अशा ६ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २०००/- रुपये व प्रमाणपत्र अशा स्वरूपात देण्यात आली.म्हणून डॉ. वर्षा तोडमल (पुणे), डॉ. अंजली जोशी (पुणे), डॉ. पुरुषोत्तम काळे (घोडेगाव) यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे यांनी, सूत्रसंचालन प्रा. शिल्पा टाकळकर व डॉ. बी. डी. अनुसे यांनी, निकालवाचन प्रा. डी. बी. बोऱ्हाडे यांनी केले तर आभार स्पर्धा संयोजक डॉ. संजय शिंदे यांनी मानले.