CHAKAN CRIME । कर्मचा-यानेच केला कंपनीत दहा लाखांचा अपहार
by
sahyadrilive
June 21, 2023 5:56 PM
चाकण । सह्याद्री लाइव्ह । चाकण औद्योगिक वसाहतीत एका कर्मचा-यानेच कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या दहा लाखांहून अधिक रकमेची अफरातफर केली असून चाकण येथील शाडोफॅक्स टेक्नॉलॉजीस्ट या कंपनीमध्ये हा प्रकार घडला आहे.
या प्रकरणी विवेक अनिल गोरटमारे (वय २९, रा. चाकण) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सागर लहु ढेरे (वय ३२, रा. काळेचीवाडी) असे फसवणूक करणा-या कर्मचा-याचे नाव आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, सागर ढेरे हा शाडोफॅक्स टेक्नॉलॉजीस्ट कंपनीच्या वाघेवस्ती, चाकण या शाखेत काम करत होता. त्याने विश्वासघात करुन कंपनीतील एकूण १० लाख सहा हजार ७९६ रुपयांचा गैरव्यवहार व आर्थिक फसवणूक केली आहे.
याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राठोड तपास करत आहेत.