द एलाइट स्कूल मध्ये शिक्षकदिन साजरा
खेड । सह्याद्री लाइव्ह । खेड तालुक्यातील पश्चिम भागात इंग्रजी माध्यमात गणल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या अशा “द एलिट स्कूल” या शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा झाला. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर रोजी जन्मदिन ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. याच दिनाचे औचित्य साधून शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून शिक्षक दिनाकडे पाहिले जाते.
शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडूनच आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टी मिळत असते. म्हणूनच याचाच एक भाग म्हणून शाळेचे संस्थापक आणि अध्यक्ष जयसिंग दरेकर तसेच संचालिका पल्लवी दरेकर यांनी कृतज्ञतेच्या भावनेतून सर्व शिक्षिकांना भेटवस्तू भेट दिल्या व आभार व्यक्त केले.
यावेळी विद्यार्थ्यांना देखील शिक्षक दिना विषयी माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाग्यश्री कोळेकर यांनी केले व मनिषा साळवी यांनी आभार व्यक्त केले.