पाईटच्या द एलिट स्कूलमध्ये पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा
विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत
पाईट (ता. खेड) । सह्याद्री लाइव्ह । पाईट येथील द एलिट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये पहिला वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नवीन वर्षातील विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून स्वागत करण्यात आले.
यावेळी नविन विदयार्थी डायरीचे अनावरण करण्यात आले, केक कापण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांच्या नृत्य व नाटक सादरीकरणाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी पालक वर्गाने शाळेवर विश्वास ठेवून आपल्या पाल्यांचे ऍडमिशन घेऊन भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल पालकांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर
भविष्यामध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांच्या प्रगतीमध्ये वाढ करण्यासाठी व शालेय अभ्यासक्रमाबरोबर इतर कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन दरेकर यांनी यावेळी दिले.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पृथ्वी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मराठे कार्यक्रमाला हजर होते. हनुमंत मराठे पालक अर्जुन भोकसे, अनिल डांगले, पूजा करंडे आदींनी यावेळी भाषण केले. शाळेच्या मुख्य डायरेक्टर व मुख्याध्यापिका पल्लवी दरेकर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले तर सर्व शिक्षक व स्टाफ यांनी नियोजन केले. यावेळी प्रमुख मार्गदर्शक भानुदास दरेकर, बाळासाहेब राळे, पालक व विद्यार्थी आदी बहुसंख्येने उपस्थित होते.
विशेष बातम्या पाहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES