राजगूरुनगरमध्ये कॅफे ठरताहेत लव्हर्स पॉईंट; पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावरच तरूणाईचे अश्लील चाळे
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर शहरामध्ये कॅफे च्या नावाखाली प्रेमी-प्रेमीकांसाठी अश्लील चाळे करण्यासाठी एकांताची जागा उपलब्ध करून दिली जात आहे. या अशा ठिकाणांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे खेड पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावरच या कॅफेंची गर्दी आहे. त्यामुळे नागरीक संताप व्यक्त करत आहेत.
राजगुरुनगर शहरात हुतात्मा राजगुरु महाविद्यालय ते राजगुरुनगर बस स्थानकापर्यंतच्या रस्त्यालगत आणि शहरातील इतर शाळा, महाविद्यालयांच्या आसपासच्या परिसरात कॅफेंची सख्या जास्त आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयातील तरूण तरूणींसाठी हे कॅफे म्हणजे भेटण्याची अगदी सोयीस्कर जागा ठरत आहे.
काही कॅफेंमध्ये पडदे लावून जागेची विभागणी केलेली असते. सभोवताली अंधाराची किंवा मेणबत्तीचा उजेड पडेल एवढीची सोय केली आहे. काही ठिकाणी तर पलंगाची सुद्धा सोय करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे.
अंधाऱ्या खोली वजा पार्टीशनमध्ये कॉलेजमधील तरुण-तरुणी असभ्य वर्तन व अश्लील चाळे करताना आढळत आहेत. यात नववी दहावीतील अल्पवयीन मुलामुलींचा सुद्धा भरणा दिसत आहे. एका तासासाठी जवळपास दोनशे ते चारशे रुपयापर्यंत शुल्क त्यासाठी आकारले जात असल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. एकांत मिळत असल्याने कॅफेचा व्यवसाय तेजीत आला असून शहरात या बाबत उलटसुलट चर्चा आहे. बेकायदेशीर व अवैध कृत्यांना प्रोत्साहन देणाऱ्या व कॅफेच्या नावाखाली सुरू असलेल्या ठिकाणांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES