मंत्रिमंडळ निर्णय
by
sahyadrilive
December 22, 2021 10:15 AM
राज्यातील नवीन आरोग्य संस्थांचे श्रेणीवर्धन करणे व नव्याने संस्था स्थापणे यासाठी हुडकोकडून 3948 कोटी रुपये कर्ज घेण्यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.
आरोग्य संस्थांचे बांधकाम करण्याकरिता राज्य शासनाकडून मागणीपेक्षा कमी प्रमाणात निधी उपलब्ध होतो. त्यामुळे जनतेस मुबलक प्रमाणात उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा तसेच उपचार मिळण्याकरीता निधी उपलब्धतेसाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक असल्याने राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत मंजूर आरोग्य संस्थांकरिता हुडको या वित्तीय संस्थेकडून पहिल्या टप्प्यामध्ये रु.3948.00 कोटी कर्ज घेण्यासाठी ३ वर्षाचा अधिस्थगन कालावधी आणि त्यापुढे १० वर्ष परतफेडीचा कालावधी व 6.95 टक्के व्याजदर तसेच इतर अटी व शर्तीसह तत्वत: मान्यता दिलेली आहे.