![हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात बॉटनिका प्रदर्शनाचे आयोजन](https://sahyadrilive.in/wp-content/uploads/2022/05/HRM-850x560.jpg)
हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात बॉटनिका प्रदर्शनाचे आयोजन
![](https://sahyadrilive.in/wp-content/uploads/2022/05/HRM.jpg)
राजगुरूनगर : हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजक्ता कौशल्य विकसित करण्यासाठी बॉटनिका प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उदघाटन खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टेपाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, संचालक बाळासाहेब सांडभोर, सतीश नाईकरे, प्राचार्य डॉ. एस. एस. पिंगळे, उपप्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, डॉ. एस. बी. सूर्यवंशी, प्रबंधक के. आर. पाचारणे उपस्थित होते.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक अशा विविध गोष्टींचा समावेश केला. यामध्ये विविध जैविक खते, कोकेडामा, काचपात्र, हर्बल टी, हर्बल ज्युस, आयुर्वेदिक साबण, स्पीरुलींना शेवाळ उत्पादन अशा अनेक प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू ठेवण्यात आल्या होत्या.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील म्हणाले, की अशा प्रकारच्या नावीन्यपूर्ण प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना नवीन संकल्पना मिळतील, ज्यातून एक नवा उद्योजक घडू शकेल. पर्यावरणपूरक जैविक खते, कोकेडामा, काचपात्र, हर्बल टी, हर्बल ज्युस, आयुर्वेदिक साबण अशा विविध वस्तूंचे मोठया प्रमाणावर उत्पादन करून विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगारातून भविष्यात व्यवसाय संधी निर्माण कराव्यात असे आवाहन त्यांनी केले.
विज्ञान विभागातील सुमारे ३४ विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनाचे आयोजन वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. के. एम. नितनवरे, डॉ. संगीथा, प्रा. पूजा कड, प्रा. रोहिणी मेचकर यांनी केले.