राजगुरुनगरमध्ये 135 जणांचे रक्तदान
राजगुरूनगर : माजी आमदार व खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष साहेबराव बुट्टेपाटील यांच्या 21 व्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात 135 रक्तदात्यांनी रक्तदान केले. स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात अभिवादन कार्यक्रम, रक्तदान शिबिर, करिअर कट्टा उद्घाटन आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या प्रसंगी संस्थाध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील, पोलीस निरीक्षक सतीश गुरव, उपाध्यक्ष नानासाहेब टाकळकर, मानद सचिव हरिभाऊ सांडभोर, संचालक डॉ. अनिल खिंवसरा, बाळासाहेब सांडभोर, सुशिल शिंगवी, हिरामण सातकर, मुरलीधर खांगटे, प्रमोद गानु, राजेंद्र टाकळकर, विजय वाडेकर, बळवंत डांगले, सामाजिक कार्यकर्ते नामदेव कलवडे, हरिभाऊ वाडेकर, कल्याणशील देखणे, प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, प्राचार्य डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, उपप्राचार्य एस. एन. टाकळकर, डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक उपस्थित होते.
पुण्याच्या ससून रक्तपेढीचे समाजसेवा अधिक्षक अरुण बर्डे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. गौरव देशमुख सहभागी झाले. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या माध्यमातून हुतात्मा राजगुरू महाविद्यालय व साहेबरावजी बुट्टेपाटील महाविद्यालयात युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी करियर कट्टा उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. करिअरसंबंधी विविध उपक्रमांबाबत समन्वयक असणारे डॉ. आर. एस. शिरसी व प्रा. ए. आर. पोखरकर यांच्याशी विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.