रक्तदान, रोगनिदान शिबीर आदी लोकहिताच्या कार्यक्रमातून स्व. इंदिराबाई कडू यांना श्रद्धांजली
बेलोरा : जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री स्व इंदिराबाई कडू यांच्या तेरवी दिनानिमित्त रक्तदान शिबिर, रोगनिदान तपासणी शिबिर व अचलपूर मतदार संघातील घाटलाडकी, आसेगाव पूर्णा, कुऱ्हा, चमक खुर्द, शिरजगाव कसबा, या सर्कलमध्ये शवपेटी वाटप करून श्रद्धांजली वाहण्यात आली, यावेळी 500 युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले,काही दिवसांपूर्वी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या मातोश्री स्व. इंदिराआई बाबारावजी कडू यांचे दुःखद निधन झाले.-त्यांच्या मागे मुलं, मुली, नातवंड तसेच प्रहार परिवार सोडून गेले तसेच निधन झाल्याच्या दिवसापासून महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते व राजकीय नेते तसेच नागरिक यांनी बेलोरा येथे श्रद्धांजली वाहण्याकरिता व राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू व कडू परिवाराचे सांत्वन करण्याकरिता भेट दिली.
बेलोरा येथे जागर आईंच्या आठवणींचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळी राज्यातून विविध कीर्तनकार, वारकरी, कवी यांनी कार्यक्रम सादर केला. यावेळी रक्तदान शिबिर, रोग निदान शिबीर आयोजनासह विविध गावांत शवपेटी वाटप करून मातोश्रीं यांना खरी श्रद्धांजली वाहण्यात आली, युवकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान केले,त्यावेळी कडू परिवार, सर्व नातेवाईक, प्रहार परिवार ,महाराष्ट्रातील प्रहार कार्यकर्ते ,नागरिक, गाववासी उपस्थित होते त्यासंगी सर्व कडू परिवार प्रहार परिवार यांनी उपस्थित राहून अथक परिश्रम घेतले.