अंधेरी पोट निवडणुकीतून भाजपची माघार
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । सध्याच्या राजकिय घडामोडींमुळे अंधेरी पुर्व विधानसभेची निवडणूक चांगलीच चर्चेचा विषय बनली आहे. त्यातच आता भाजपचे उमेदवार मुरूजी पटेल यांनी या निवडणूकीतुन माघार घेतल्यामुळे पुन्हा एकदा निवडणूकीचे रंगरूप पालटणार असे दिसत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाचे अंधेरी पुर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पदासाठी रमेश लटके यांच्या पत्नी ॠतुजा रमेश लटके यांनी अर्ज भरला असून भाजपचे मुरूजी पटेल हेही या स्पर्धेत उतरले होते. राजकीय नेत्यांच्या आग्रहामुळे त्यांनी आज या निवडणूकीतुन माघार घेतली.
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी यासंदर्भात भाजप नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहीत पटेलांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध व्हावी असे मत पत्रकार परिषदेत व्यक्त केले होते.