“भाजपने देखील भारत जोडो यात्रेला पाठिंबा द्यावा” – संजय राऊत
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी १०३ दिवसांच्या अटकेनंतर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राजकिय नेत्यांची भेट घेणार असल्याचं सोगितलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं. त्यापुर्वी त्यांनी काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले की, काँग्रेसची भारत जोडो देशातील कटुता संपविण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. ही एक चळवळ आहे. देशातील कटुता दूर करण्यासाठी ही यात्रा सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपने देखील या यात्रेला पाठिंबा द्यावा, असं आवाहन राऊत यांनी मोदी आणि शहा यांच्या भेटीआधी केलं आहे. शिवाय काँग्रेसची “भारत जोडो यात्रा” ही भाजपच्या विरोधात नसून लोकांना एकत्र करण्यासाठी असल्याचं राऊत यांनी म्हटलं.