गुजरात मधे भाजपने केले ७ आमदारांना निलंबित
गांधीनगर । सह्याद्री लाइव्ह। भाजप पक्षाने तिकीट नाकारले,म्हणुन अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या सात नेत्यांना भारतीय जनता पक्षाने शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित केले.”या आमदारांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर.पाटील यांच्या हवाल्याने स्पष्ट झाले आहे.
निलंबित करण्यात आलेल्या भाजप नेत्यांमध्ये नर्मदा जिल्ह्यातील नंदगड येथील हर्षद वसावा, जुनागढमधील अरविंद लाड, यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या शिवाय सुरेंद्रनगरमधील धनगड्रा येथील चत्रसिंह गुंजरिया, वलसाडमधील पराडी येथील केतन भाई पटेल, राजकोट ग्रामीणमधील भरत भाई चावडा, गिर सोमनाथ जिल्ह्यातील वेरावळ येथील उदय भाई शहा आणि अमरेलीच्या राजुलातून तिकीट मागणाऱ्या करण भाई बरैया यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
गुजरातमध्ये भाजपने ४२ विद्यमान आमदारांना तिकीट दिले नाही. १६० उमेदवारांच्या पहिल्या यादीची घोषणा करणाऱ्या भाजपने ३८ विद्यमान आमदारांना तिकीट नाकारले. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्या अनेक नेत्यांना भाजपने डच्चू दिल आहे.
2017 च्या गुजरात निवडणुकीत भाजपने 182 पैकी 99 जागांवर विजय मिळवला होता. मागील २७ वर्षांपासून भाजपची गुजरातमध्ये सत्ता राहिली आहे. पंतप्रधानपदी निवड होण्यापूर्वी नरेंद्र मोदी हे गुजरातचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत.