दिनविशेष : संगितविषयक मासिकाचे संपादक, ग्रंथलेखक,चरित्रकार बाळकृष्ण रघुनाथ देवधर यांचा जन्म
११।०९।१९०१
by
sahyadrilive
September 10, 2022 6:28 PM
सह्याद्री लाइव्ह। बाळकृष्ण रघुनाथ देवधर यांचा जन्म मिरज येथे झाला. १९९५ मध्ये त्यांनी संगीत शिक्षणाच्या प्रचारासाठी प्रोफेसर देवधर्स स्कुल आफ इंडियन म्युझिक सुरु केले.
आखिल भारतीय गांधर्व विद्यालयाचे ते अध्वर्यु होते व त्यांच्या संगीत कलाविहार या मुखपत्राचे १९७५ पर्यत त्यांनी संपादन केले. तसेच त्यातुन सातत्याने लेखनही केले त्यांनी गायनाचार्य पंडित विष्णू दिगंबर हे चरित्र ही लिहिले तसेच रागबोध या नोटेशन पुस्तकाची पाच भागांत बांधणी केली. संगीतातील रागचिकित्सा, चिजा, गायकांच्या घराण्यांचे इतिहास याविषयी त्यांनी विपुल व अभ्यासपुर्ण लेखन केले.