तिवसा तालुक्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते १ कोटी २० लक्ष रुपयांच्या निधीतून विविध विकासकामांचे भूमिपूजन
अमरावती : ग्रामीण भागातील विविध विकासकामे पुर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲङ यशोमती ठाकुर यांनी येथे दिली. तिवसा तालुक्यात आज विविध विकासकामांच्या भूमिपूजन ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. विविध भूमिपूजनांमध्ये विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, अभ्यासिका, रस्ता बांधकाम, रस्त्याचे काँक्रिटीकरण, स्मशानभुमी परिसराचे सौंदर्यीकरण आदी विकास कामांचा समावेश होता.
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्राप्त 42 लक्ष रुपयांच्या निधीतून विद्यार्थ्यांकरीता अभ्यासिका व वाचनालय इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन ॲड ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. नागरी दलितेतर योजनेअंतर्गत सार्वजनिक हिंदु स्मशानभूमीच्या 11 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या सौंदर्यीकरणांच्या कामाचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले. तिवसा नगर पंचायत कार्यालय परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत अंदाजे 5 लक्ष रुपयांच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्ता बांधकामाचे भूमिपूजन व सिमेंट नाली बांधकामाच्या कामाचे अंदाजे 21 लक्ष रुपयांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. तिवसा तालुक्यात योजनेअंतर्गत प्राप्त निधीतुन रस्त्यांच्या, नालीच्या कामाचे व परिसर सौदर्यीकरणा सारख्या विविध कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले. नगराध्यक्ष योगेश वानखेडे, नगर परिषदेच्या उपाध्यक्ष प्रिया विघ्ने, जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप काळबांडे, नगरसेवक वैभव वानखेडे आदी उपस्थित होते