भास्कर शिंगाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतीक आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड
माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । नुकताच संतोषनगर येथे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता प्रशिक्षण मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यामध्ये राजगुरुनगरचे भास्कर शिंगाडे यांची भारतीय जनता पक्षाच्या सांस्कृतीक आघाडीच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राजगुरुनगर जवळील संतोषनगर (भाम) येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये हा कार्यकर्ता मेळावा पार पडला. भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन भास्कर शिंगाडे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. भास्कर यांना मिळालेल्या जबाबदारीबद्दल पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते बाळा भेगडे, पुणे जिल्हाध्यक्ष शरद बुट्टेपाटील, अनुसुचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अमर भोगाडे, पक्षाचे कार्यकर्ते आणि महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://youtube.com/@newsanalysis_SAHYADRILIVE
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES