१५ ऑगस्टपुर्वी शेतक-यांच्या कर्जमाफीतील उर्वरित रक्कम खात्यात जमा होणार
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । नियमित पीककर्ज भरणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीतील उर्वरित रक्कम १५ ऑगष्टपुर्वी शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे, असे अश्वासन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत दिले.
नियमित पीककर्ज भरणा-या शेतक-यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफी सरकारकडून देण्यात येत आहे. परंतू ई-केवायसी होत नसल्याने अनेक शेतक-यांची कर्जमाफी रखडली आहे. नियमित पीककर्ज भरणा-या निम्म्या शेतक-यांना अद्याप प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही. हे प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी विधानपरिषदेत करण्यात आली होती.
त्यावर उत्तर देताना मुंडे यांनी प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जमाफीतील उर्वरित रक्कम १५ऑगस्टपुर्वी शेतक-यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे अश्वासन दिले आहे.
सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुंडे यांनी कृषी योजनांचा आढावा घेत विविध आश्वासने दिली. यासाठी पुरवणी मागण्यांमध्ये आवश्यक तरतूद करण्यात आली असल्याचेही कृषीमंत्र्यांनी सांगितले. या निर्णयामुळे स्वातंत्र्यदिनापुर्वी शेतक-यांना दिलासा मिळणार आहे.
“जलयुक्त शिवार”मध्ये आणखी पाच हजार गावांचा समावेश
राज्यात जलयुक्त शिवार, टप्पा दोनच्या माध्यमातून आणखी पाच हजार गावांचा समावेश करण्यात येत आहे. जलपातळी वाढण्यास याची मदत होणार आहे. शेतीसाठी फायदेशीर ठरलेली ‘पोकरा’ योजना प्रत्येक गावात लागु व्हावी यासाठी पोकराचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येत आहे आणि मराठवाड्यातील ‘वॉटर ग्रीड प्रकल्पा’च्या पुर्णत्वासाठीही सरकार प्रयत्नशील असल्याचे कृषीमंत्र्यानी सांगितले.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES