दिवाळीनिमित्त उद्यापासुन देशभरात बँक हॉलिडे
by
sahyadrilive
October 21, 2022 1:04 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । शाळांसह अनेक खासगी कंपन्याच्या दिवाळीच्या सुट्या सुरू झाल्या आहेत. उद्यापसून देशभरातल्या बँकांनाही दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर झाल्या असून नागरिकांना आपली बँकेची कामे करण्यासाठी आजचाच दिवस हातात राहीला आहे. दिवाळी असल्याने जवळपास सहा दिवस बॅँका बंद असणार आहेत.
उद्यापासून बँकांना सुट्ट्या सुरु होत आहेत. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीजसह काही दिवस बँका बंद असणार आहेत. यात पुढचा सगळा आठवडा जाणार आहे. ऱिझर्व्ह बँकेने जाहीर केल्यानुसार देशभरातील बँका पुढील सहा दिवस बंद असणरा आहेत. काही सुट्ट्या या राष्ट्रीय स्तरावरील आहेत. तर काही सुट्ट्या या त्या त्या भागातील सणांनुसार आहेत. यामध्ये काही राज्यांमध्येच बँकेच्या शाखा बंद असतात.