व्हेल माशाच्या उलटी प्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर
पुणे : बेकायदेशीरपणे व्हेल माशाची उलटी विकीसाठी कुरीयरने पाठविल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील पिंपरी-चिंचवड परिसरात उघडकीस आला होता. याप्रकरणी पिंपरी-चिचंवड गुन्हे शाखेच्या युनिट-1 ने तीन आरोपी विरूध्द गुन्हा (एफ. आय. आर) दाखल करून तिघांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडुन एक कोटी दहा लाख रूपयाची व्हेल माशाची उलटी जप्त केली होती. सर्व आरोपींवर वन्यजीव संरक्षण कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील मुख्य आरोपी अल्ताफ अली उर्फ डी. पी. मेकर यांच्या बाजुने मुंबई उच्च न्यायालयातील ऍड. श्रीकांत ठाकुर यांनी बाजु मांडली.
व्हेल माशाच्या उलटीला Ambrigris ऍम्ब्रीग्रस असे म्हणतात तसेच त्याला समुद्रात तरंगणारे सोने देखील म्हणतात. व्हेल माशाच्या उलटीचा उपयोग परफ्युम इन्डस्ट्री व कॉस्मॅटीकसाठी वापर केला जातो. भारतात स्पर्म व्हेल वन्य जिव कायदा अनुसूचीत अंतर्गत संरक्षीत प्रजाती आहेत. ऍम्ब्रीग्रस व त्याच्या उप उत्पादनांसह कोणत्याही उत्पादनाचा ताबा किंवा व्यापार वन्यजिव संरक्षण तरतुदीनुसार बेकायदेशीर आहे. असे आढळून आले आहे ऍम्ब्रीग्रसची तस्करी करणाऱ्या टोळया किनारी भागातून विकत घेतात आणि इतर काही देशांद्वारे बाहेर पाठवितात. व्हेल माशाची उलटी व्यापारास व्हेल माशाच्या उलटी व्यापारास
बंदी असणारे देश कायदेशीर मान्यता असणारे देश
भारत
अमेरीका
ऑस्ट्रेलिया
युनायटेड किंगडम
कायदेशीर मान्यता असणारे देश
फ्रान्स
स्विझर्लंड