आळंदीत होणार वक्तृत्व स्पर्धेतून संतविचारांचा जागर
पुणे/आळंदी, दि. १६
संत परंपरेचा सामाजिक, सांस्कृतिक मागोवा घेत आषाढी एकादशीला दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या रिंगण वार्षिकाने या रविवारी १९ तारखेला आळंदीत राज्यस्तरीय खुल्या वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलंय. केवळ संतविचारांवर आधारित असलेली ही पहिली आणि एकमेव वक्तृत्वस्पर्धा आहे.
संत नामदेवरायांचं ७५२ वं जन्मवर्ष, संत ज्ञानेश्वर माऊलींचं ७२५ वं समाधी वर्ष आणि वार्षिक रिंगण दशकपूर्तीचं निमित्त साधून ‘रिंगण वक्तृत्वस्पर्धा २०२१’चं आयोजित करण्यात आलं आहे. ‘श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी’च्या विशेष सहकार्याने आयोजित ही स्पर्धा आळंदीच्या चाकण चौकातील अमृतनाथ स्वामी महाराज संस्थेच्या सभागृहात होणार आहे. या स्पर्धेला तरुणांचा महाराष्ट्रभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रासह एकूण ४५ हजारांची रोख बक्षिसं हे स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे.
‘संत नामदेव – ग्लोबलही लोकलही’, ‘ज्ञानेश्वरी – माझ्या नजरेतून’, ‘ऐसे कैसे झाले भोंदू’, ‘धर्म तेथ विवेका, असणे की जे’, ‘रिंगण – आपल्या मुळांचा शोध’ या विषयांवर तरुणाई आपले विचार मांडणार आहे. स्पर्धेचं उद्घाटन हभप मारोतीबाबा कुरेकर यांच्याहस्ते होईल. तर शेतकरी आंदोलक विजय विल्हेकर, हभप राजाभाऊ चोपदार, हभप पुरुषोत्तम पाटील यांची स्पर्धेसाठी उपस्थिती असणार आहे.
रिंगण आषाढी विशेषांकाचं हे दहावं वर्षं आहे. रिंगणला महाराष्ट्रभरातून प्रतिसाद मिळतो, त्यात तरुणांची संख्या लक्षणीय असते. तरुणांमध्ये संत विचारांचा जागर करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली असल्याचं रिंगणचे संपादक सचिन परब यांनी सांगितलं. राज्यभरातील वाचणारे, लिहिणारे तरुण संत साहित्याविषयी