नियमांचे उल्लंघनप्रकरणी ‘व्हॉट्सअॅप’ने तब्बल 22 लाखांहून अधिक जणांचे खाते बंद केले आहेत. ‘व्हॉट्सअॅप’च्या मासिक अहवालात याचा खुलासा करण्यात आला आहे. इतर वापरकर्त्यांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. तुमच्याकडूनही व्हाट्सअॅपच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि तुमचे अकाउंट बॅन होऊ नये यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा.
व्हॉट्सअॅपने युजर्सची सुरक्षा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन अकाऊंट्सवर बंदी घातली आहे. अॅपच्या अहवालात तब्बल 22 लाख 9 हजार खात्यांवर कायमची बंदी घालण्यात आल्याचे समोर आले आहे. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, ‘युजर्सच्या तक्रारी आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. गैरव्यवहार रोखण्यासाठी असा निर्णय घेण्यात आला आहे. सप्टेंबरमध्ये, कंपनीला तक्रारी प्राप्त झाल्या.
हजारो स्पॅम मेसेज पाठवल्याचे अनेकदा दिसून येते. जर एखाद्याने स्पॅम संदेश पाठवला आणि त्याची तक्रार नोंदवली गेली, तर त्यांचा नंबर ट्रॅक केला जातो आणि योग्य वेळी त्यावर बंदी घातली जाते. त्याच वेळी, जर तुम्ही व्हॉट्सअॅपद्वारे एखाद्याला पॉर्न सामग्री पाठवली तर ते खाते त्वरित ब्लॉक केले जाईल आणि जर एखाद्या वापरकर्त्याने चाइल्ड पॉर्न सामग्री पाठवली किंवा फॉरवर्ड केली तर त्याला तुरुंगवासही होऊ शकतो.
तुम्ही व्हॉट्सअॅपवर थर्ड पार्टी अॅप्स वापरत असाल तर ते लगेच बंद करा. कारण यातून तुमचे खाते बॅन होऊ शकते. अॅप स्टोअरवर अनेक थर्ड पार्टी अॅप्स आहेत. यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता धोक्यात येते. थर्ड पार्टी अॅप्सवर बंदी घालण्यात आली आहे, असेही व्हॉट्सअॅपने म्हटले आहे. अॅप दर महिन्याला स्कॅनिंग करते. जर एखादा वापरकर्ता थर्ड पार्टी अॅप्स वापरताना पकडला गेला तर त्याच्यावर बंदी घातली जाते. पण ही तात्पुरती बंदी आहे. म्हणजेच, पुनरावलोकनानंतर, तुमचे खाते पुन्हा सक्रिय केले जाऊ शकते.
administrator
जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा
आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे
आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.