अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार?
औरंगाबाद । सह्याद्री लाइव्ह । काही दिवसांपासून माजी मंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र अशोक चव्हाण यांनी या फक्त अफवा असल्याचा खुलासा केला होता. शिंदे गटाचे नेते आणि कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मोठं विधान केलं. अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची कुजबुज सुरु असून, चव्हाण यांचे समर्थक असलेल्या आमदारानेच आपल्याला ही माहिती दिली असल्याचंही अब्दुल सत्तार म्हणाले.
औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर बोलतांना सत्तार म्हणाले, अशोक चव्हाण यांचे समर्थक आमदार राजूरकर यांच्याकडे मी याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी चव्हाण भाजप प्रवेशाची कुजबूज सुरू असल्याचा राजूरकर यांनीच मला सांगितले असल्याचं सत्तार म्हणाले.