भगवान महावीर जन्मकल्याणदिनी राजगुरुनगरमध्ये तब्बल २३ महिलांनी केले रक्तदान
भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक दिन विविध कार्यक्रमांनी साजरा
राजगुरुनगर : भगवान महावीर स्वामी जन्मकल्याणक दिनानिमित्त राजगुरुनगर शहरामध्ये सकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जन्मकल्याणक दिनाचे स्वागत जैन बांधवांकडून गरबा खेळत करण्यात आले. सकाळी १० ते दुपारी ४ दरम्यात आयोजित रक्तदान शिबिरात १२५ जणांनी रक्तदान केले. राजगुरूनगरमध्ये पहिल्यांदाच २३ महिलांनी रक्तदान केले. प्रत्येक रक्तदात्यास जैन श्रावक संघाच्या वतीने 4 लिटरचे ‘वॉटर कुल जार’ भेट देण्यात आले.
रक्तदान शिबिरास सामाजिक संस्था हुतात्मा राजगुरु सोशल फाऊंडेशन, जाणीव परिवार, बजरंग दल, भीमज्योत मित्र मंडळच्या सदस्यांनी तसेच राजगुरुनगर शहरातील सर्वच मंडळांच्या सदस्यांनी भेट दिली.
जैन समाजाची अग्रगण्य असणारी अरिहंत नागरी पतसंस्था येथे लॉकर सुविधा तसेच नवीन कार्यालयाचे उद्घाटन संघाचे माजी अध्यक्ष विजय भन्साळी, अध्यक्ष प्रदीप कासवा, फुलचंद ओसवाल, सुशील शिंगवी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अरिहंत नागरी पतसंस्थेमार्फत कार्यक्रमानंतर सर्वांची गौतमप्रसादीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संतोष बोथरा, प्रकाश गदिया, लालचंद कर्नावट, अमर टाटीया, अजय बलदोटा, चंदन खारीवाल, सागर बलदोटा, प्रवीण संघवी, नितेश ओसवाल, कमलेश पोखर्ना, गौरव, गुगलिया, सौरभ लुणावत, विशाल कासवा, माजी नगरसेवक किशोर ओसवाल, नीलम मुथा, मनोज कासवा, पायल ओसवाल, अमित लुणावत, मनीष बोरा, मोतीलाल गदिया, राजेंद्र टाटीया, अनिश ओसवाल आदी जैन बांधव उपस्थित होते.