केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मुंबईत आगमन
by
sahyadrilive
September 5, 2022 10:22 AM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । गणेशोत्सवानिमित्त मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आज मुंबईत आगमन झाले. वायुदलाच्या विशेष विमानाने रात्री ९. ४९ वाजताच्या सुमारास येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे आगमन झाले.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, खासदार पूनम महाजन, आमदार प्रवीण दरेकर, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार, राजशिष्टाचार विभागातील वरिष्ठ अधिकारी, पोलिस विभागातील वरिष्ठ अधिकारी व जिल्हाधिकारी यांसह इतर मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.