महाविकास आघाडीला अजुन एक धक्का
by
sahyadrilive
October 21, 2022 12:35 PM
मुंबई । सह्याद्री लाइव्ह । महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयाला शिंदे-फडणवीस सरकारने धक्का दिला आहे. CBI ला महाराष्ट्रात चौकशीसाठी प्रतिबंध घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला होता. त्यामूळे सरकाच्या परवनगीशिवाय CBI ला महाराष्ट्रात कुठलीही चौकशी करता येत नव्हती.
शिंदे-फडणवीस सरकारने हा अडथला दूर करत CBI ला चौकशीसाठी लागणारी ‘जनरल कॅसेन्ट’ पुन्हा बहाल केली आहे. त्यामुळे आता CBI ला कुठल्याही चौकशीसाठी सरकारच्या परवनगीची गरज भासणार नाही.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीने घेतलेला हा निर्णय रद्द करत शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरेंना आणि महाविकास आघाडीला आणखी एक धक्का दिला आहे.