आनंदनगर रहिवाशांचाही पाण्यासाठी टाहो; पाणीप्रश्नाबद्दल मुख्याधिका-यांना निवेदन
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगर शहराचा पाणीप्रश्न दिवसंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील ब-याचशा भागात पाणीच येत नसल्यामुळे लोक संताप व्यक्त करत आहेत. आर्या स्ट्रीम सोसायटीजवळील ओढ्यात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. या दोन्ही प्रश्नांबाबत गुरुवारी (दि. २७) आर्या स्ट्रीम सोसायटीतील रहिवाशांच्यावतीने स्वप्निल राक्षे यांनी राजगुरुनगर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांना निवेदन दिले आहे.
आनंदनगरमधील आर्या स्ट्रीम या सोसायटीला राजगुरुनगर नगरपरिषदेकडून पाणीपुरवठा केला जातो. परंतू गेले पंधरा दिवस या सोसायटीला पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सोसायटीमध्ये जवळपास ४०० ते ५०० लोक राहतात. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे त्यांना दररोज दहा ते पंधरा टँकर पाणी विकत घ्यावे लागत आहे.
आर्या स्ट्रीम या सोसायटीच्या बाजूला एक ओढा आहे. ओढ्याजवळून एक पायवाट जाते. त्यामुळे आसपाचे लोक येता जाता ओढ्यात कचरा टाकतात. या कच-यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असून त्याचा त्रास सोसायटीमध्ये राहणा-या लोकांना होत आहे. त्यामुळे नगरपरिषदेने यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी स्वप्निल राक्षे यांनी केली आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES