कुरुळीत स्वतंत्र पोलीस चौकी उभारणार
महाळुंगेचे वरिष्ठ निरीक्षक पवार : ग्रामपंचायतीस दिली भेट
चिंबळी – कुरुळी (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या हद्दीत बेकायदेशीर दारू धंद्यांवर करणार कारवाई करणार आहे. त्याचबरोबर कुरूळी गावात स्वतंत्र पोलीस चौकी उभारणार असल्याची माहिती महाळुंगे इंगळे पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी दिली.
खेड तालुक्यात सर्वांत मोठी समजली जाणारी ग्रामपंचायत कुरुळी असून, आणि गावच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिली, त्यावेळी पवार बोलत होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक सुरेश यमगर, पोलीस हवालदार संपत मुळे, शहानवाज मुखांनी, तानाजी गाडे, श्रीधन इचके, अर्चना काळे, पोलीस पाटील प्रतिभा कांबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शांताराम सोनवणे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष एम. के. सोनवणे, सरपंच कविता गायकवाड, उपसरपंच विशाल सोनवणे, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य शरद मुऱ्हे, सामाजिक कार्यकर्ते अजित गायकवाड, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या संचालिका कमल कड, माजी उपसरपंच बेबी कड, स्वप्निल कांबळे, ग्रामविकास अधिकारी कविता कोतवाल यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
अरविंद पवार म्हणाले की, गावातील विविध घडणाऱ्या घटना आमच्या पर्यंत पोहोविण्याचे काम पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्यांचे आहे. गावात घडणाऱ्या घटना या गावातच समोपोचाराने मिटवल्या पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.