कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणारा ट्रक सोडविण्यासाठी करण्यात आलेला अर्ज अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला
खेड : आंबेगाव, खेड, जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागात कत्तलीसाठी जनावरे पुरवणारा मुख्य पुरावठादारास राजगुरुनगर-खेड (पुणे) येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने चांगलीच चपराक दिली. कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणा-या वाहन सोडविण्यासाठी करण्यात आलेला अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
प्रथमेश नथू उगले (रा. उगलेवाडी, शिनोली, ता. आंबेगाव) असे वाहन सोडविण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करणा-या पुरवठादाराचे नाव आहे. जनावारांच्या ‘या’ व्यवसायासाठी वारंवार वापरलेली त्याची गाडी सोडण्यासाठी नुकताच राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाकडे अर्ज केला. मात्र प्रथमेश उगले याच्या विरोधात जय गोमाता प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ गो शाळेतर्फे मानद पशुकल्याण अधिकारी तथा अध्यक्ष बाळासाहेब शंकर कौदरे यांनी न्यायालयात धाव घेतली होती.
यासंदर्भात न्यायालयाने अर्जदाराच्या वकिलांचा तसेच गो शाळेतर्फे ॲड. निलेश आंधळे यांनी युक्तिवाद केला. ॲड. निलेश आंधळे यांचा युक्तीवाद ऐकून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. पतंगे यांनी प्रथमेश उगले याचा गाडी सोडण्याचा अर्ज फेटाळून लावला.
न्यायालयाच्या या निकालामुळे जनावरांची बेकायदा कत्तल करणारे आणि जनावरांची मांस विक्री करणा-यांना चांगलीच चपराक बसली आहे. याशिवाय नागरिकांचा न्यायव्यवस्थेवरचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे, असल्याचेही पशुपालक, गो-रक्षकांनी सांगितले.