अमित शहा यांचा रविवार पुणे दौरा
महापालिकेतील दोन कार्यक्रमांना उपस्थिती
by
sahyadrilive
December 15, 2021 2:45 PM
पुणे- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवार पुणे दौर्यावर येणार आहेत. पुणे महापालिकेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी भूमिपूजन आणि डॉ. भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकर यांच्या हस्ते या वेळी होणार आहे.
विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने शहा २६ नोव्हेंबरला पुणे दौर्यावर येणार होते. मात्र, त्यांचा हा दौरा पुढे ढकलण्यात आला होता. त्यानुसार आता ते १९ डिसेंबर पुण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली.
या दौर्यात शहा यांच्या हस्ते महापालिकेच्या नवीन विस्तारित इमारतीच्या प्रवेशव्दारावर बसविण्यात येणार्या डॉ आंबेडकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावर होणार आहे. त्याचबरोबर महापालिका भवनासमोर बसविण्यात येणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळ्यासांठी भूमिपूजन होणार आहे.