ऐश्वर्या, करिना ते प्रियांका; ‘या’ आहेत बॉलिवूडमधील टॉप- 5 अभिनेत्री
मुंबई : बॉलिवूडमध्ये नावाजलेल्या अभिनेत्री चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कोट्यवधींचे मानधन घेतात. सौदर्यासह आपल्या अभिनयाच्या जोरावर अनेक अभिनेत्री बॉलिवूडमध्ये तगडे मानधन घेताना दिसून येतात. बॉलिवूडमधील अभिनेत्रींच्या संपत्तीबाबत अनेकांना माहित नसेल. तर जाणून घेऊयात बॉलिवूडमधील टॉप- 5 अभिनेत्री.
टॉप- 5 अभिनेत्रीच्या यादित सर्वात प्रथम अभिनेत्री पैकी ऐश्वर्या राय बच्चनचा नंबर लागतो त्यानंतर देशीगर्ल प्रियांका चोप्रा दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या क्रमांकावर करिना कपूर, चौथ्या स्थानी अनुष्का शर्माचा नंबर लागतो. टॉप- 5 मध्ये दीपिका पादूकोण पाचव्या स्थानी आहे.
ऐश्वर्या राय बच्चन
अभिनेत्रीच्या यादित प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनचे नाव नबंर एकवर आहे. ऐश्वर्या बॉलिवूडमधील सर्वात अभिनेत्री आहे. ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती ही 100 मिलियन डॉलर एवढी आहे.
प्रियांका चोप्रा
अभिनेत्री प्रियांका चोप्रा जवळ 70 मिलियन डॉलर एवढी संपत्ती आहे. अभिनेत्रीच्या यादित तिचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते.
करिना कपूर
तिसऱ्या क्रमाकांवर अभिनेत्री करिना कपूर नाव असून ती 60 मिलियन डॉलर एवढ्या संपत्तीची मालकिण आहे. करिना चित्रपटाव्यतीरिक्त डान्स इंडिया डान्स: बॅटल ऑफ द चँपियन्स या शोचं परीक्षण करत होती. ती या शोच्या एका एपिसोडसाठी 3 कोटी मानधन घेत होती.
अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्माची एकूण संपत्ती ही 46 मिलियन एवढी आहे. अभिनेत्रीच्या यादित तिचे नाव चौथ्या क्रमांकावर आहे.
दीपिका पादूकोण
बॉलिवूडमधील टॉप-5 अभिनेत्रींमध्ये दीपिका पदूकोणचं नाव पाचवा क्रमांकावर आहे. तिची एकूण संपत्ती 40 मिलियन डॉलर एवढी आहे.