दोनशे कृषिपंपांना वीजजोड देण्याचे उदिष्ट
खेडमध्ये मागेल त्या शेतकऱ्याला वीजजोड मिळणार - कार्यकारि अभियंता ठाकरे
राजगुरूनगर – शेतकऱ्यांनी तीन विजेचे खांब (200 मीटर) टाकल्यानंतर कृषिपंपास वीजजोडची प्रकरणे मंजुर करण्याचे अधिकार खेड उपविभागाला आहेत. अशा प्रकारे 200 कृषिपंपांना वीजजोड देण्याचे उदिष्ट खेड तालुक्यात ठेवण्यात आले आहे, अशा सूचना तालुक्यातील महावितरणच्या उपशाखा अभियंताना देण्यात आल्या आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मागेल त्याला कृषी पंपासाठी वीजजोड पुरवले जाणार असल्याची माहिती महावितरणचे खेड उपविभागाचे कार्यकारी अभियंता मनिष ठाकरे यांनी दिली.
शेतकऱ्यांनी आपल्या भागातील महावितरण कार्यालयाशी संपर्क साधुन सर्व कागदपत्रांची पूर्तता करावी. तालुक्यातुन कृषिपंपांच्या वीजजोडची मागणी संख्या न पहाता जे शेतकरी वीज कोटेशन भरतील ज्यांना खांबांची गरज नाही अशा शेतकऱ्यांना त्वरीत वीजजोड दिले जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांना तीन विजेचे खांब लागत आहे. अशा शेतकऱ्यांना शेतीत पिकांचे नुकसान होत नसेल तर त्वरीत विजेच्या खांबांचे कामे करून घेऊन त्यांना वीजजोड दिली जाणार आहे.
तालुक्यातून प्राप्त कृषीपंपांसाठी वीज कनेक्शन जोडणी साठी कोटेशन भरण्यासाठी शेतकऱ्यांचा मेळावा भरवण्यात येणार आहे. या मेळाव्यात एकाच वेळी सर्व कृषिपंपधारकांना वीज कोटेशन भरण्याची पावतीचे वितरण केले जाणार आहे. शेतकऱ्यांनी कृषीपंपांच्या वीजजोडसाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करुन वीजजोडसाठी मागणीची नोंदणी करणे आवश्यक आहे.
सव्वादहा कोटी उपलब्ध
महावितरणच्या धोरणानुसार गावनिहाय वीज ग्राहकांनी भरलेल्या रक्कमे पैकी 33 टक्के रक्कमेचा वापर केला जाणार आहे. खेड तालुक्यातील 158 गावेमिळून 10 कोटी 24 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. ज्या गावातील वीजग्राहकांनी वीज बीले भरली आहेत, अशा गावात वीजेसंदर्भात एकूण रक्कमेच्या 33 टक्के रक्कम संबंधित गावातील ट्रान्सफॉर्मर (रोहित्र)साठी खर्च करण्यात येणार आहे, अशी माहिती मनिष ठाकरे यांनी दिली.
तर स्वतंत्र रोहित्र बसवणार
एकाच जागेवरून पाचपेक्षा जास्त कृषिपंपांना वीजजोड मागणी असेल तर स्वतंत्र रोहित्र बसविणे, एखाद्या रोहित्रावर जादा लोड शिल्लक नसेल तर त्या परिसरात मागणी असेल तर असा रोहित्र बदलणे, ज्या रोहित्रावर मागणीपेक्षा जादा लोड असेल असे रोहित्र बदलून वीजपुरवठा सुरळीत करणे अशी कामे केली जाणार आहे. वीजेसंदर्भात कामे करण्यासाठी गावनिहाय प्राप्त निधी खर्च केला जाणार आहे.
कृषिपंपांना वीजजोड घेण्यासाठी आता आम्हाला दिलेले टारगेट पूर्ण झाले. आता नाही, पुढच्या वेळी पाहू असे म्हनून उडवाउडवीची उत्तरे देऊन कोणी पैशांच्या मागणीसाठी टाळाटाळ करीत असेल तर शेतकऱ्यांनी राजगुरूनगर येथे वाडा रस्त्यावरील उपविभागीय कार्यालयात संपर्क साधावा
– एम. बी. ठाकरे, कार्यकारी अभियंता, महावितरण, खेड.