कृषी विभागाने जिल्ह्यात बांधले १ हजार १४७ वनराई बंधारे; खेड तालुक्यात ६१ वनराई बंधारे
कामासाठी शालेय विद्यार्थी, स्थानिक सामाजिक संस्था, महिला बचत गटांचे श्रमदान
कामासाठी शालेय विद्यार्थी, स्थानिक सामाजिक संस्था, महिला बचत गटांचे श्रमदान
पुणे । सह्याद्री लाइव्ह । पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाने लोकसहभागातून आणि श्रमदानातून जिल्ह्यात १ हजार १४७ वनराई बंधारे बांधले.. दरवर्षी पावसाचे हजारो लीटर पाणी ओढे, नाल्यांमधून वाहुन जाते. या पाण्याची अडवणूक केली तर त्या भागातील शेतीला याचा फायदा होऊ शकतो. याच संकल्पनेतून जिल्हा कृषी विभागाने हा प्रकल्प राबवला आहे.
खेड तालुक्यात याप्रकारचे ६१ वनराई बंधारे बांधण्यात आले असून या कामासाठी शालेय विद्यार्थी आणि स्थानिक सामाजिक संस्था, महिला बचत गट आणि ग्रामस्थांनी श्रमदान केले. सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू भरून ओढ्या नाल्यांवर या गोण्याचा बांध घालून पाणी अडवले जाते. या वनराई बंधा-यांमुळे रब्बी हंगामातील पिके आणि फळांना संरक्षित पाणीसाठा उपलब्ध झाला असल्याची माहिती पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे यांनी दिली.
administrator
जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा
आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे
आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.