राजगुरुनगरचे कांदा लसूण संशोधनालय आणि वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्यामध्ये करार
ऊस, कांदा व लसूण पीकावरील संशोधनासाठी तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होणार
ऊस, कांदा व लसूण पीकावरील संशोधनासाठी तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होणार
राजगुरुनगर । सह्याद्री लाइव्ह । राजगुरुनगरचे कांदा लसूण संशोधनालय आणि मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्ही.एस.आय.) यांच्यामध्ये ऊस, कांदा व लसूण पीकावरील संशोधनासाठी पायाभूत सुविधा पुरवणे व तंत्रज्ञानाचे आदानप्रदान करण्याबाबत करार करण्यात आला आहे.
या करारामुळे कांदा व लसणाचे नवीन वाण तयार करता येणार आहेत. त्यामूळे उत्पादन क्षमतेत आणि टिकाऊपणामध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे. त्यामूळे या कराराचा फायदा ऊस, कांदा व लसूण उत्पादक शेतक-यांना होणार आहे.
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटने ऊसासाठी ‘वसंत उर्जा’ हे जैवसंजीवक तयार केले आहे. या जैवसंजीवकाचा फायदा ऊस उत्पादकांना होत आहे. परंतू या जैवसंजीवकाला अद्याप शास्त्रीय शिफारस मिळालेली नाही. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट आणि भाभा अनुसंशोधन केंद्रामध्ये गॅमा किरणोत्सारी विकरनीत तंत्रज्ञानावरही संशोधन सुरू आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES
administrator
जगभरातील बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स हवे आहेत? सबस्क्राइब करा
आपण वृत्तपत्राची यशस्वीरित्या सदस्यता घेतली आहे
आपली विनंती पाठवण्याचा प्रयत्न करताना एक त्रुटी आली. कृपया पुन्हा प्रयत्न करा.