आरक्षण स्थगितीनंतर ‘ओबीसी’ उमेदवारांचे धाबे दणाणले
जिल्हा बॅंकेसाठी आमदार मोहिते, राजाराम लोखंडे, शरद बुट्टे पाटील रिंगणात
खेड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी सोसायटीच्या “अ’ वर्ग गटातून राष्ट्रवादीच्या दोन, तर भाजच्या एका नेत्याने अर्ज दाखल केल्याने खेड तालुक्यात जिल्हा बॅंकेसाठी निवडणूक रंगणार आहे.
आमदार दिलीप मोहिते-पाटील हे गेली सहा वर्षे बॅंकेचे संचालक असून, त्यांनी सोमवारी (दि. 6) अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, पंचायत समितीचे अरुण चौधरी, कैलास सांडभोर, लक्ष्मण टोपे, विलास कातोरे, जयसिंग भोगाडे, कैलास लिंभोरे आदी उपस्थित होते.
आमदार दिलीप मोहिते यांच्यासह माजी आमदार स्व. आप्पासाहेब तथा साहेबराव सातकर यांचे चिरंजीव जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे उपाध्यक्ष हिरामण सातकर यांनी “अ’, “क’, “ड’ अशा तीन मतदार संघातून अर्ज दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील आणि आमदार मोहिते समर्थक तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम लोखंडे यांनी सुद्धा सोसायटीच्या “अ’ वर्ग गटातून अर्ज दाखल केला आहे. बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा नूतन आवटे यांनी महिला प्रतिनिधी म्हणून अर्ज दाखल केला आहे. तर माजी आमदार स्व. सुरेश गोरे यांचे बंधू नितीन गोरे यांनी “ब’ आणि “क’ वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष, विद्यमान संचालक किरण मांजरे यांनी “ड’ गटातून अर्ज दाखल केला आहे.