एएफसी वुमन्स एशियन कप भारत २०२२ : जपानचा एकतर्फी विजय
पुणे : दोन वेळच्या गतविजेत्या विजेत्या जपानने एएफसी वुमन्स एशियन कप भारत २०२२ स्पर्धेत म्यानमार संघाचा ५-० गोलने धुव्वा उडविला. तसेच या स्पर्धेतील आपली विजयी सुरुवात केली. या विजयामुळे संघ व्यवस्थापक फुतोशी एकेडा यांच्या जपानच्या संघाला आगामी सामन्यासाठी स्थान मिळाले आहे. पुण्यातील म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलात झालेल्या क गटातील या सामन्यात जपानने जबरदस्त खेळ करत सामन्यावर एकतर्फी विजय मिळविला.
जपानची युवा महीला फुटबॉलपटू रिको युकी हिने जपान संघासाठी पहिल्या सत्रापासून शानदार कामगिरी करत जपान संघाला १-० गोलने आघाडी मिळवून दिली. तिने २२ व्या मिनिटाला पहिला गोल केला.त्यानंतर युई हासेगावा हिने ४७ व्या मिनिटाला आणि हिकारू नाओमोटो हिने ५२ मिनिटाला असे गोल करत या दोन्ही महिला फुटबॉलपटूनी दुसऱ्या सत्रात शानदार कामगिरी करत संघाला विजयी आघाडी मिळवून दिली.
त्यानंतर पयार्यी फुटबॉलपटू युई नारूमिया हिने ७० मिनिटाला आपल्या संघाचा शानदार चौथा गोल केला. त्याचवेळी सामन्याच्या अतिरिक्त वेळेत (इंज्युरी टाइम) हासेगावा हिने पाचवा गोल करत सामन्यावर वर्चस्व मिळविले.
जपानने सुरुवातीपासून शानदार खेळाचे प्रदर्शन केले. तसेच या चारही फुटबॉलपटुंनी केलेली आक्रमक सुरुवात हेच जपानच्या विजयाचे कारण ठरले. युकी हिने मारलेला शानदार गोल यामुळे म्यानमारच्या फुटबॉलपटुंना संधी मिळाली नाही. २२ मिनिटांपासून म्यानमारच्या फुटबॉलपटु गोल करण्यासाठी धडपडत होत्या मात्र जपानी फुटबॉलपटुंनी सामान्यावरील आक्रमक पवित्रा यामुळे म्यानमारच्या फुटबॉलपटुंना गोल करता आले नाहीत जपानच्या खेळाडूचा पाय सहा यार्डमध्ये पडला, त्यामुळे जपानची गोलकिपर अकाया यामाशिता हिला चेंडू खाली ठेवल्यामुळे दंड आकारण्यात आला.
या विजयासह जापानने सोमवारी होणाऱ्या व्हियेतनामविरुद्धची आपली स्थिती भक्कम केली आहे. म्यानमारची पुढची लढत कोरियाविरूद्ध होईल.