स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब
पुढील वर्षापासून सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा अवलंब करणार
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । पाणलोट क्षेत्रांच्या शाश्वत विकासासाठी सुरू केलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा यशस्वीरित्या सुरू झाला आहे. या योजनेत मृदा आणि जलसंधारणातून पाणलोट क्षेत्रांचा विकास करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जातात.
या अभियानाच्या दुस-या टप्प्यात आतापर्यंत सुमारे पावणेतीन हजार गावांमध्ये जवळपास साडेतेरा हजार कामांना सुरूवात झाली आहे. या अभियानामध्ये बुलढाणा जिल्हा सगळ्यात अग्रेसर आहे. बुलढाण्यात सर्वाधिक ९७ टक्के गावांमध्ये कामांना सुरूवात झाली आहे.
‘जलयुक्त शिवार २.०’
राज्यशासनाच्या या महत्वकांक्षी प्रकल्पाचा दुसरा टप्पा ५ हजार ६८६ गावांमध्ये राबवण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी २०२३ -२४ या आर्थिक वर्षामध्ये ३ हजार ८८६ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत, तर या योजनेसाठी आजपर्यंत ६६७.९१ कोटी रुपये खर्च झाले आहेत. त्यापैकी १९९.२५ कोटी रुपये स्वतंत्रपणे जमा करण्यात आले आहेत.
४८ टक्के कामांना प्रत्यक्ष सुरूवात
जानेवारी महिन्यापासून या कामांना सुरूवात झाली असून आतापर्यंत २ हजार ७५९ गावांमध्ये १३ हजार ६१० म्हणजेच मान्यतेपैकी ४८.५२ टक्के कामे प्रत्यक्षपणे सुरू झाली आहेत.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES