श्री क्षेत्र भीमाशंकर महाशिवरात्री यात्राव्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज
by
sahyadrilive
February 17, 2023 5:45 PM
भीमाशंकर । सह्याद्री लाइव्ह । बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावे ज्योतिर्लिंग म्हणजे श्री क्षेत्र भीमाशंकर. दरवर्षी लाखो भाविक महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी येथे गर्दी करतात. प्रशासन या यात्रेच्या व्यवस्थापनासाठी सज्ज आहे. भाविकांना कुठल्याही गोष्टीचा त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या गेल्या आहेत.
यात्रेसाठी मुक्कामी येणा-या भाविकाच्या राहण्याची सोय, वाहनतळ ते भीमाशंकर बसस्थानकापर्यंत मीनी बसची सुविधा तसेच वाहतुकीचे व्यवस्थापन, दर्शनबारी, मुखदर्शन आणि पासची व्यवस्था यासोबतच महाशिवरात्रीच्या पार्श्वभुमीवर मंदीरपरिसरातील अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत. यात्रेदरम्यान काेणत्याही प्रकारची गैरसाोय हाेऊ नये याची दक्षता प्रशासनाकडून घेतली गेली आहे.