‘आदिपुरूष’ पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात; नेपाळमध्ये बॉलिवूडवर बंदी
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । बॉलिवूडचा नुकताच रिलिज झालेला ‘आदिपुरूष’ हा सिनेमा पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात अडकला आहे. काही महिन्यांपुर्वी म्हणजे २०२२ च्या ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित झालेला ‘आदिपुरूष’ या सिनेमाचा टिजर असाच वादात सापडला होता. त्यानंतर जनतेने आक्षेप घेतलेल्या गोष्टींमध्ये बदल करून हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार होता.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा चित्रपटातील काही डायलॉग्स, कलाकारांचे पोषाख अशा काही आक्षेपार्ह गोष्टींमुळे हा चित्रपट सोशल मिडीयावर ट्रोल होताना दिसत आहे. काही ठिकाणी शो बंद पाडल्याच्या घटनाही घडल्या आहेत.
‘आदिपुरूष’ हा सिनेमा ‘रामायण’ या हिंदू महाकाव्यावर आधारित आहे. रामायण आणि त्यामधील पात्र ही हिंदू धर्मीयांसाठी पुजनीय आहेत. त्यामुळे हा सिनेमा हिंदूंसाठी श्रद्धेचा विषय आहे. रामायण खरंच घडले कि नाही या मुद्दयावर भाष्य करणा-या ‘रामसेतु’ या चित्रपटनंतर रामायणावर आधारित आदिपुरूष हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय होता.
टिजर मध्ये आक्षेप घेतलेल्या काही गोष्टींमध्ये बदल केलेला ट्रेलरमध्ये दिसल्यामुळे प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक होते. परंतू या चित्रपटातील लंका आणि रावणाचा लुक पुन्हा एकदा वादाचा विषय ठरत आहेत.
चित्रपटातील काही डायलॉग्स चर्चेचा विषय ठरत आहेत. ‘जो हमारी बिना को हाथ लगाएंगे, उनकी लंका लगाएंगे’, ‘कपडा तेरे बाप, तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की, जलेगी भी तेरे बाप की’ हनुमान आणि मेघनाथ यांच्या पात्रांसाठी लिहिलेले या डायलॉग्समुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड संताप दिसत आहे.
नेपाळमध्ये बॉलिवूड बॅन
या चित्रपटाला नेपाळमध्ये सर्वाधिक विरोध होत आहे. आदिपुरूष चित्रपटामुळे नेपाळमध्ये या चित्रपटासोबत सर्वच हिंदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे. चित्रपट जरी वादात सापडला असला तरी या चित्रपटाने आतापर्यंत दोनशे कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूड सिनेमांचा दर्जा घसरताना दिसून आला आहे. अनेक वादातीत कारणांमुळे काही चित्रपट बॉयकॉट झालेलेही आपण पाहिले आहेत. चित्रपट हे संपूर्ण समाजाच्या वैचारिक आणि भावनीक दृष्टिकोनावर प्रभावी परिणाम करत असतात. त्यामुळे समाजाची नैतिकता जपून राहण्यासाठी चित्रपटांचा दर्जा टिकून राहणे अतिशय महत्वाचे आहे. आदिपुरूष चित्रपटामध्ये दाखवलेल्या काही गोष्टींमुळे लोकांच्या धार्मिक भावना दूखावल्या गेल्यामुळे या आपल्याला या संतप्त प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.