अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार मंत्री सांदीपान भुमरे यांची माहिती
by
sahyadrilive
August 25, 2022 2:48 PM
मुंबई | सह्याद्री लाइव्ह। अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री सांदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते.
मंत्री सांदीपान भुमरे यांनी सांगितले की, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. रिक्त असणाऱ्या पदाच्या भरतीची कार्यवाही लवकरच करण्यात येईल.
अल्पसंख्याक विभागाच्या अखत्यारितील विविध समित्या आणि मंडळावरील नियुक्ती करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. तसेच अल्पसंख्याक विभागात निधी खर्च होण्यासाठी विविध विभागांशी समन्वय ठेवण्यात येईल, अशी माहितीही मंत्री भुमरे यांनी दिली.
सदस्य रईस शेख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.