आरोग्य तज्ञांच्या मते रोज दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर
तुम्हाला आठवते का, तुमची आई परीक्षा किंवा कोणत्याही महत्त्वाच्या कार्यक्रमासाठी बाहेर जाण्यापूर्वी तुमच्या तळहातावर दही ठेवायची? अध्यात्मानुसार दही खाणे शुभ मानले जाते, तर विज्ञान दही खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानते. लैक्टोबॅसिलस डेलब्रुएकी नावाच्या जीवाणूचे संवर्धन करून दुध आंबवून दही तयार केले जाते.
मलाईदार आणि स्वादिष्ट दही जगातील सर्वात स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पदार्थांपैकी एक मानले जाते. आरोग्य तज्ञांच्या मते, सर्व लोकांनी आपल्या दैनंदिन आहारात दही समाविष्ट करणे आवश्यक आहे. अभ्यास दर्शवितो की दहीमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात, जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतात. या व्यतिरिक्त, दही अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवर घरगुती उपाय म्हणून वापरला गेला आहे. चला तर, आज दररोज दही खाल्ल्यामुळे मिळणाऱ्या विस्मयकारी आरोग्याच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.
- पचन सुरळीत ठेवते
दहीचे सेवन योग्य पचन राखण्यासाठी उपयुक्त मानले जाते. दही एक प्रोबायोटिक डेअरी उत्पादन आहे जे आपले आतडे निरोगी ठेवते. दहीमध्ये असलेले उपकारक जीवाणू पचन संस्थेतील सूज कमी करण्याबरोबरच यकृताचे आरोग्य वाढवतात. पोटदुखी, अतिसार किंवा अपचन या समस्येमध्ये दहीचे सेवन फायदेशीर ठरू शकते. - रोग प्रतिकारशक्ती वाढवते
करोनाच्या या संकटकाळात रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याच्या उपायांवर सर्वत्र भर दिला जात आहे. अशा परिस्थितीत दही खाणे हा तुमच्यासाठी चांगला पर्याय असू शकतो. दह्यात असलेले सक्रिय बॅक्टेरिया रोगास कारणीभूत जंतूंशी लढतात आणि आपले आतडे निरोगी ठेवतात. दही विविध जीवनसत्त्वे आणि प्रथिने तसेच लैक्टोबॅसिलस समृद्ध आहे जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. - त्वचेसाठी फायदेशीर
दही तुमच्या त्वचेला मॉइश्चराइज करते आणि कोरडी त्वचा नैसर्गिकरित्या बरे करते. दहीमध्ये आढळणारे लैक्टिक ऍसिड एक्सफोलिएटर म्हणून काम करते जे त्वचेच्या मृत पेशी काढून निरोगी त्वचेला प्रोत्साहन देते. दही हा अनेक वर्षांपासून नैसर्गिक फेसपॅक म्हणून वापरला जात आहे. त्वचेचा रंग उजळण्यासाठी हळद मिसळुन दही लावण्याचा सल्ला दिला जातो. - हाडे मजबूत बनवते
‘या’ विस्मयकारक फायद्यांमुळेच रोज दही खाण्याचा सल्ला दिला जातो !दहीचे दररोज सेवन केल्याने शरीरातील कॅल्शियमचे प्रमाण वाढते, ज्यामुळे तुमची हाडे मजबूत होतात. आरोग्य तज्ञांच्या मते, एका सर्व्हिंग (3/4 कप) दहीमध्ये सुमारे 275 मिलीग्राम कॅल्शियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. ज्या लोकांना सांधेदुखी किंवा हाडांच्या दुखण्याची समस्या आहे त्यांना दररोज दही खाण्याचा सल्ला दिला जातो.