आवास योजनांच्या कामांना गती देऊन प्रत्येक गरजूला घर मिळवून द्या- जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू
by
sahyadrilive
January 3, 2022 9:40 AM
अमरावती : प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश जलसंपदा व कामगार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी चांदुर बाजार येथे दिले.
चांदूर बाजार शहरातील विविध कामांचा आढावा घेताना ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह नगरपरिषदेचे विविध अधिकारी उपस्थित होते.
शहरात सुनियोजनबद्ध विकास कामे राबवावीत. आवास योजनांच्या कामांना गती द्यावी. प्रत्येक गरजू व्यक्तीला घर मिळवून देण्यासाठी आवास योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश राज्यमंत्री कडू यांनी दिले.
अमृत योजना पाणीपुरवठा, रमाई आवास योजना, शहरातील घनकचरा व्यवस्थापन झ नगरोत्थान योजना आदी विविध योजनांच्या कामांचा आढावा राज्यमंत्र्यांनी घेतला.