अब्दुल सत्तार यांचे वादग्रस्त वक्तव्य
महाराष्ट्र । सह्याद्री लाइव्ह । कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रीया सुळे यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केली आहे. सुळेंविषयी ‘भिकार’ असे असे शब्द वापरत टिका केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत निषेध व्यक्त केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी अब्दुल सत्तारांवर टीका करताना म्हटलं होतं की, पन्नास खोके तुम्हाला पण मिळाले आहेत का? यावर सत्तारांनी उत्तर देताना म्हटलं, ते तुम्हाला हवे आहेत का? य़ावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, तुमच्याकडे खोके आले असतील म्हणूनच तुम्ही ते आम्हाला ऑफर करता आहात. सुप्रिया सुळे यांच्या या विधानावर सत्तार भडकले आणि त्यांचं आपल्या बोलण्यावरील नियंत्रण सुटलं अन् ते म्हणाले, इतकी भिकार….झाली असेल सुप्रिया सुळे तर त्यांनाही देऊ.
सुप्रिया सुळेंना अशा प्रकारे शिवीगाळ का केली? असा सवाल जेव्हा सत्तारांना पत्रकारांनी विचारला तेव्हा सत्तार म्हणाले, “ते आम्हाला खोके खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का?”
सत्तार यांना ते वक्तव्य भोवणार की त्याचे आणखी काय परिणाम होणार याविषयी सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. सत्तार यांनी प्रतिक्रिया देताना पातळी सोडली आणि ते जे नाही ते बोलून गेले, असे त्यांच्या पक्षातील काही नेत्यांनी म्हटले आहे.