दुधनी परिसरातील गैरप्रकारांची सखोल चौकशी करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
by
sahyadrilive
August 25, 2022 2:15 PM
मुंबई |सह्याद्री लाइव्ह। सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या विविध गैरप्रकारांबाबत चौकशी करण्यात येईल असे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य सचिन कल्याणशेट्टी यांनी आज उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, अक्कलकोट तालुक्यातील दुधनी परिसरातील विविध प्रकारच्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे. आरोपींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे.