चाकण एसटी स्टॅण्ड परिसरात प्रवाशांचा मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्यास अटक
by
sahyadrilive
November 26, 2022 1:28 PM
चाकण । सह्याद्री लाइव्ह । चाकण एसटी स्टॅण्ड परिसरात वाटसरू, प्रवाशांचा मोबाईल लांबविणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दि. २५) सकाळी दहा वाजता हा प्रकार घडला.
या प्रकरणी एका १७ वर्षीय युवकाने फिर्याद दिली आहे. याबाबत शाम किशनराव दीक्षित (वय ४७, रा. तळेगाव चौक, चाकण, मूळ – चोबारा, उद्गीर, जि. लातूर) असे अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा १७ वर्षीय युवक आहे. हा युवकाने चाकण एसटी स्टॅण्ड परिसरात शुक्रवारी (दि. २५) सकाळी दहा वाजता थांबला होता. त्यावेळी शाम दीक्षित यांनी युवकाचा पाच हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविला. त्यानंतर शाम दीक्षीत याच्या मुलाने तो मोबाईल एका दुकानदारास विकला, अशी तक्रार आहे. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.