मैत्रिणीला भेटण्यासाठी घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलगी घरी परतीलच नाही
चाकण परिसरातील बालाजीनगरमधील घटना; पोलिसांत ‘मिसिंग’ दाखल
by
sahyadrilive
November 5, 2022 4:50 PM
चाकण । सह्याद्री लाइव्ह । मैत्रिणीला भेटून येते असे सांगून घराबाहेर पडलेली १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी परतलीच नाही. या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणी एका ४२ वर्षीय व्यक्तीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजीनगर परिसरात राहतात. फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी गुरुवारी (दि. ३) दुपारी अडीचच्या सुमारास मैत्रिणीला भेटून येते, असे सांगून घराबाहेर पडली. मात्र त्यानंतर घरी परतलीच नाही. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून मुलीला फुस लावून पळविले, असे तक्रारीत नमूद केले आहे.
या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार राठोड तपास करीत आहेत.