मंत्रालयाच्या इमारतीवरुन एका शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
by
sahyadrilive
November 17, 2022 4:39 PM
मुंबई। सह्याद्री लाइव्ह । मंत्रालयामध्ये एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरुन उडी घेतली होती. जाळीमुळे त्याचा जीव वाचला आहे. हा तरुण बऱ्याच वेळ जाळीवर पडून होता. त्यानंतर काही वेळ जाळीवरच उभे राहून तो आपल्या मागण्या मांडत होता. त्यानंतर त्याला खाली उतरवण्यात आले. घटनास्थळी पोलिस दाखल झाले होते.
ह्या सगळ्या प्रकारामूळे मंत्रालय परिसरात लोकांनी गर्दी केली होती. आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्याने हे पाऊल उचलल्याचं या व्यक्तीने सांगितलं. या शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आपली नाराजी व्यक्त केली.