धक्कादायक । शाळेत मुलींच्या शौचालयात आढळला सीसीटीव्ही कॅमेरा
मावळ तालुक्यातील आंबी गावच्या शाळेतील धक्कादायक प्रकार
मावळ । सह्याद्री लाइव्ह । मावळ तालुक्यातील डी. वाय. पाटील संस्थेच्या शाळा व महाविद्यालयामध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या शाळेत मुलींच्या शौचालयामध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे आढळून आले आहेत. या प्रकारानंतर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण केली आहे. कोट्स ॲलेक्झांडर असे मारहाण झालेल्या मुख्याध्यापकाचे नाव आहे.
महिला पोलीस अधिका-यांनी केली प्रत्यक्ष पाहणी
तळेगाव दाभाडेजवळील या शाळेमध्ये विशिष्ट धर्माचा प्रसार केला जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांकडून करण्यात आला आहे. शाळेतील सीसीटीव्ही प्रकरणानंतर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. महिला पोलीस अधिका-यांनी शाळेत प्रत्यक्ष पाहणी केली असून अधिक तपासानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन वरिष्ठ पोलीस निरिक्षक रणजीत सावंत यांनी दिले आहे.
बजरंग दल आक्रमक
मावळ तालुक्यातील आंबी या गावामध्ये डी. वाय. पाटील संस्थेची शाळा व बारावीपर्यतचे कॉलेज आहे. या शाळेमध्ये विशिष्ट धर्माची प्रार्थना म्हणायला लावणे आणि हिंदू सणांच्या दिवशी शाळेला सुट्टी दिली जात नसल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. मुलींच्या शौचालयामध्ये सीसीटीव्ही आढळल्यानंतर बजरंग दल आणि पालक आक्रमक झाले आहेत. पालकांनी यासंदर्भात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापकास मारहाण केली आहे.
विशेष बातम्या पहा आमच्या YouTube Channels वर
‘सह्याद्री लाइव्ह’ – https://www.youtube.com/@limitless_world
‘खेड टाइम्स’ – https://www.youtube.com/@KHEDTIMES