चाकण ‘एमआयडीसी’मध्ये २० वर्षीय महिलेवर अत्याचार
महिला गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस
चाकण । सह्याद्री लाइव्ह । फिरायला जावू असे म्हणून महिलेचा गैरफायदा घेत एकाने २० वर्षी महिलेवर अत्याचार केला. या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शरीरसबंधांनंतर महिला गरोदर राहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे महाळुंगे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी कोमलकांत (रा. खराबवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत २० वर्षीय पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यात फिरायला जावू असे सांगून कोमलकांत याने पीडित महिलेला खराबवाडी गावच्या हद्दीतील चाकण-तळेगाव रस्त्यालगत इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या मागे बोलावले. पेट्रोल पंपाच्या मागील दूरवर एका शेतात नेऊन तिच्याशी शरीरसबंध निर्माण केले. या सबंधातून पीडित महिला गरोदर आहे. त्यानंतर आरोपीने फिर्यादींसोबत लग्न करण्यास विरोध दर्शविला. तसेच फोन बंद केला म्हणून कोमलकांत यांच्याविरोधात पीडित महिलेने फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी महाळुंगे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक दत्तात्रय जाधव तपास करीत आहेत.