जुन्नरमधील नाल्यांचे रुपडे पालटणार
नगराध्यक्ष शाम पांडे : शहरात तीन कोटींच्या कामांचे भूमिपूजन
जुन्नर : शहरातील नाले आता नवीन रुप घेणार असल्याचे प्रतिपादन नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सांगितले. जुन्नर नगरपरिषदेच्या वतीने सुमारे तीन कोटी रुपयांच्या कामांचा भूमिपूजन समारंभ मंगळवारी पार पडला त्यावेळी नगराध्यक्ष पांडे बोलत होते. फिश मार्केट पासून कल्याण पेठ नाल्याचे तसेच तेली बुधवार पेठ नाल्याचे बांधकाम व कॉंक्रिटीकरण, खलीलपुरा सज्जाद बेपारी घराजवळील गल्लीत, अन्सार सौदागर घराजवळील गल्ली.
तसेच मुस्तफा चौधरी घरामागे पाईप गटर व कॉंक्रीटीकरण, बेळे आळी चौक ते भोई आळी चौक रस्ता, खालचा माळीवाडा दत्तमंदिर समोरील गल्ली, दत्तात्रय बिडवई ते खंडू लोखंडे घरापर्यंत, गणपती मंदिर ते अजित वाणी घरापर्यंत पाइप गटर व कॉंक्रिटीकरण, सिद्धांकर गल्ली, भगत गल्ली पाइप गटर व कॉंक्रिटीकरण, दिल्ली पेठ चौधरी घर ते नांगरे घरापर्यंत तसेच भास्कर घरापासून शेटे घरासमोरील पाइप गटर व कॉंक्रिटीकरण, शुक्रवार पेठ गणपती मंदिरापासून ते हनुमान मंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे, आगर पेठ कालिका माता मंदिर ते हनुमान मंदिर पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे.
तसेच शिपाई मोहल्ला शिवकुंज पतसंस्थेसमोरील बोळ, हैदरभाई घराजवळील गल्ली, मोकाशी घर ते चंदीपुरा रस्ता पाइप गटर व कॉंक्रिटीकरण, माई मोहल्ला शफी तिरंदाज घरासमोरील सर्व लेन, दर्गा जवळील गल्ली पाइप गटर व कॉंक्रिटीकरण करणे, मंगळवार पेठ इनामदार घराजवळ तसेच शहा यांच्या घरासमोरील गल्लीत पाइप गटर व कॉंक्रिटीकरण करणे, मुस्लीम समाज दफनभूमी अंतर्गत परिसर कॉंक्रिटीकरण करणे आदी सर्व कामांचे भूमिपूजन पार पडले.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष दीपेश परदेशी, अलका फुलपगार, अक्षय मांडवे, अविन फुलपगार, सुवर्णा बनकर, हजरा इनामदार, भाऊ कुंभार, कविता गुंजाळ, समीर भगत, अश्विनी गवळी, अंकिता गोसावी, सना मन्सुरी, फिरोज पठाण, सुनील ढोबळे, नरेंद्र तांबोळी आदी सर्व उपस्थित होते. नगराध्यक्षांनी ठेकेदारांना काम दर्जेदार व चांगल्या पद्धतीचे करण्याच्या सूचना दिल्या. व नागरिकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले.