ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत भीमा-कोरेगाव येथे मानवंदना अर्पण करणार
by
sahyadrilive
January 1, 2022 3:38 PM
मुंबई : भीमा – कोरेगाव येथे मानवंदना अर्पण करण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे 1 जानेवारी 2022 रोजी भीमा-कोरेगाव येथे सकाळी 11.30 वाजता उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर 12 वाजता ते वढू-बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.